Shri Yogeshwari Devi Stotra – Seema Damle



This is a beautiful stotra of Shri Yogeshwari Devi. Music composed and sung by Seema Damle.

source

29 thoughts on “Shri Yogeshwari Devi Stotra – Seema Damle

  1. अंबे त्रिपुर सुंदरी आदी माये,

    दारिद्रय दुःख भय नाशिनी दावी पाये

    तुझा अगाध महिमा वर्णिता न कळेपुराणी

    श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 1 ||

    आता क्षमा करशील अपराध माझा,
    मी मूढ केवळ असे परी दास तुझा

    तू सांडशील मजला जरी हो निदानी
    श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 2 ||

    लज्जा समस्त तुजला मज बालकाची,

    तू माऊली अतिशय कनवाळू साची

    व्हावे प्रसन्न मजला परसोनी कानी

    श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 3 ||

    नेणो पदार्थ तुज वाचून आण काही,
    तू मायबाप अवघेच गणगोत आई

    तुझाच आश्रय असे जरी सत्य मानी
    श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 4 ||

    निष्ठुरता जरी मनी धरशील आई,
    रक्षील कोण मजला सांग उपाय काही

    आणिक देव दुसरा हृदयात नाही

    श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 4 ||

    हे चालीले वय वृथा पडलो प्रपंची,
    तेणे करुनी स्थिरता न घडे मनाची

    दुःखार्ण वात पडलो धरी शिघ्र पाणी
    श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 5 ||

    जाळीत असे हा भवताप आगी,

    त्याचे निवारण करी मज भेटवेगी

    आनंद सिंधू लहरी गुण कोण वर्णी
    श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 6 ||

    तू धन्य या त्रिभुवनात समर्थ कैसी,
    धाके तुझ्या पळसुटे रिपू दानवासी

    येती पूजेसी सुर बौसोनिया विमानी
    श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 7 ||

    जैसे कळेल तुजला मज पाळ तैसे,

    मी प्रार्थितो सकळ साक्ष विधान ऐसे

    गोसावी नंदन म्हणे मज लावी ध्यानी
    श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 8 ||

  2. ताई खूप छान म्हणलं आहे तुम्ही ,हे स्तोत्र लिखित स्वरूपात टाकू शकता का , लिहून घेईन रोज वाचता येईल

  3. आई तुझ देऊळेश्वरी माते हे सर्व संकट दूर कर सर्व निवारण कर माझी इच्छा पूर्ण कर माय माऊली तू जगाची सावली सर्वच काहीतरी

Leave a Reply to @swatiacharya2762 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Optimized by Optimole